पाट मतकरीवाडी येथे १७ जून रोजी भव्य मोफत “महा-आरोग्य शिबिर” चे आयोजन 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा. लि., वेंगुर्ला आणि एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाइफटाईम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी भव्य महा-आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. बुधवार १७ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आले असून, आदिशक्ती मंगल कार्यालय, भैरव मंदिराजवळ, मतकरीवाडी, पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे.

या आरोग्य शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात जनरल मेडिसिन, कान-नाक-घसा (ईएनटी), नेत्ररोग, दंतचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अस्थिरोग विभाग तसेच बालरोग विभाग अशा विविध विभागांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय गरजेनुसार ईसीजी (ECG), रक्तातील साखरेची तपासणी (Blood Sugar Test) तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर आवश्यक तपासण्याही करण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शिबिरास येताना आयुष्मान भारत (ABHA) कार्ड, आधार कार्ड तसेच त्यास लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणावा, असेही नमूद करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा :

संपर्क : ८३९०० ०५९९४ / ७७९८२ ९४०४८ यांच्याशी संपर्क साधावा.