वेंगुर्ले l प्रतिनिधी :मातोंड – गावठणवाडी येथील रहिवासी सुरेश गंगाराम वडाचेपाटकर उर्फ आबा सोनार (७४) यांचे मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, भावजया असा परिवार आहे.
तळवडे बाजारपेठ येथील महेश ज्वेलर्सचे मालक महेश वडाचेपाटकर, सावंतवाडी भाजपच्या शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर व प्रसिद्ध टेनिस क्रिकेटपटू कृष्णा वडाचेपाटकर यांचे ते वडील तर मातोंड गावच्या सरपंच मयुरी महेश वडाचेपाटकर यांचे ते सासरे होत.











