गोकृपा अमृतम जैविक द्रावण शेतीसाठी फायध्याचे!

मसुरे | झुंजार पेडणेकर : भरतगड इंग्लीश मेडियम स्कूल मसूरे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा 1 राबविण्यात आले.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना उप कृषि अधिकारी श्री. श्रीपाद चव्हाण यांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी , ई पिक पाहणी , खरीप हंगाम नियोजन , अल निनो पार्श्वभूमीवर शेती मध्ये घ्यावयाची दक्षता , फळबाग लागवड , मागेल त्याला काजू कलमे योजना , नारळ विकास बोर्ड योजना , कृषि यांत्रिकीकरण , कोकण जलकूंड , सूक्ष्म सिंचन , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रीया योजना , गोपिनाथ मूंडे शेतकरी अपघात सानूग्रह अनूदान योजना इत्यादी विविध योजनांची माहिती दिली. तसेच गोकृपा अमृतम जैविक द्रावण कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

सदर कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार श्री. गणेश लव्हे, शाळा समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा परिषद सदस्या श्रीम. हडकर, पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच श्री. संदीप हडकर, राजेश गावकर, विविध विभागांचे प्रतिनिधी , कृषि सेवक श्री. इंगोले आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.