मालवण | प्रतिनिधी : मालवण एसटी आगार ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस दाखल झाल्या आहेत. सोमवार 22 जून पासून या नव्या बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. अशी माहिती मालवण आगार प्रमुख यांनी दिली.
आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून या बसेस मालवण बसस्थानकला प्राप्त झाल्या आहेत. नव्या बसेसमुळे विध्यार्थी, महिला व जेष्ठ नागरिकांसह प्रवासी वर्गाचा प्रवास अधिक आरामदाई होणार आहे.











