कारण अज्ञात
रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील मारुती मंदिर येथील लॉजच्या बाथरुममध्ये ठाणे येथील तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 23 जून रोजी सायंकाळी 7 वा.सुमारास उघडकीस आली.
आकाश दिलीप लोखंडे (34, रा.अंबरनाथ ईस्ट,ठाणे) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश हा काही कामानिमित्त ठाण्यात रत्नागिरीत आला होता. तो मारुती मंदिर येथील आसरा लॉजमध्ये वास्तव्याला होता. मंगळवारी सायंकाळी त्याने अज्ञात कारणातून लॉजमधील रुम नंबर 114 मधील बाथरुममध्ये अँगल कॉकला बेडशीटचा तुकडा कैचीने कापून त्याव्दारे गळफास घेतला. याबाबत लॉजमधील कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी आकाशला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आकाशला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












