▪️होतकरू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वितरण
मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा च्या वतीने उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत
यश मिळवून इस्त्रो दौऱ्यासाठी निवड झालेली पेंडूर हायस्कूलची विद्यार्थिनी
प्रिया पेंडूरकर व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनी साईश हिंदळेकर, सौजन्या सावंत, मनस्वी परब, भूमी परब, समृद्धी गावडे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
केंद्रप्रमुख पदावर बढती मिळालेले कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख गौरव नाईक यानी मुलाना मागदर्शन केले. स्पर्धा परीक्षा महत्वाच्या असून त्यासाठी शालेय जीवनातच गणिताचा पाया भक्कम करा. त्याचा कायमच पुढील आयुष्यात उपयोग होतो. ज्या सेवांगणाच्या कट्टा शाखेत शिष्यवृती मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेतला त्याच ठिकाणी केंद्रप्रमुख पद स्विकारल्या वर माझा पहिला सत्कार होतोय याचा विशेष आनंद वाटतो असे ते म्हणाले.
वडाचा पाट केंद्रप्रमुख तेजल ताम्हणकर यानी इस्त्रो या संस्थेची महत्वपूर्ण माहिती विद्यार्थर्याना दिली. इस्त्रोच्या प्रांगणात गेल्यावर वेगळीच अनुभूती मिळते. विचारात वैज्ञानिक दृष्टीकोन बळकट होतो माझ्या मुलीमुळे मला ही संधी मिळाली. केंद्रप्रमुख झाल्यावर पहिला सत्कार सेवांगणने केला याचा विशेष आनंद वाटतो असे त्या म्हणाल्या.
मालवणचे नूतन केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर यानी कठोर परिश्रमास पर्याय नाही. खूप अभ्यास व मेहनत घेवून मुलानी आपली गुणवत्ता वाढवावी. सेवांगणाची कट्टा शाखा गेली अनेक वर्ष कट्टा परिसरात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करते याचे कौतुक त्यानी केले.
काळसे हायस्कूलचे माजी मुख्याध्यायक टीएस पेडणेकर यानी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.चौके गावचे गावडे गुरुजी यानी मुलांचे अभिनंदन करून मागदर्शन केले.
किशोर शिरोडकर यानी आज खूपच आगळा वेगळा कार्यक्रम असून प्रमुख अतिथी सुद्धा मेरीटवर केंद्र प्रमुख ही परीक्षा उतीर्ण झालेत त्यांचेही त्यानी
अभिनंदन केले. बाळू राणे यानीही मुलाना मार्गदर्शन केले.
प्रिया पवार व मनस्वी परब या दोन मुलानी मनोगत व्यक्त केले.
दीपक भोगटे यानी प्रास्ताविक केले.
वैष्णवी लाड यानी सूत्रसंचालन केले.
या वेळी प्रिया पवार व गुणवंत विद्यार्थ्याना रोख रक्कम अभिनंदन पत्र व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
अरविद शंकरदास स्मरणार्थ आशिष शंकरदास यानी दिलेल्या १० हजार देणगीतून तसेच वराडकर हायस्कूल बॅच ९३ यानी दिलेल्या ५ हजार रुपये देणगीतून २० गरीब मुलाना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले
देवीदास पवार यानी दिलेल्या देणगीतून
सुजाता पार्टे या विद्यार्थिनीस रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या वेळी मान्यवरांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास
किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, महेंद्र महाभोज, गौरव नाईक, गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, गावडे गुरुजी, अर्जून पेंडूरकर, दीपक भोगटे, ॲड. समृद्धी म्हाडगुत, टीएस पेडणेकर, बाळू राणे, सर, जगदिश नलावडे, धुत्रे गुरुजी, प्रिया पेंडूरकर, दिनेश भोजणे, गणेश वाईरकर, देसाई मॅडम,धोंडीराम सावत, भास्कर नाईक, विद्या चिंदरकर, बाळकृष्ण गोंधळी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.













