कशाळीकर उद्योग समूहात गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांच्या यशाचा केला सन्मान

सावंतवाडी :तनया रेडकर

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय यश आणि मेहनतीचा गौरव करणारा कार्यक्रम नुकताच हॉटेल रुची डिलक्स येथे उत्साहात पार पडला. हॉटेल रुची डिलक्स व कशाळीकर उद्योग समूहातील कर्मचारी तसेच त्यांच्या मुलामुलींच्या यशाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला गोव्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ. मीना समुद्र, अर्चना व्यास, हॉटेल कर्मचारी, मित्रमंडळी व कशाळीकर उद्योग समूहाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील यशाचा गौरव करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच मेहनत, सातत्य आणि शिक्षणाचे महत्त्व समाजासमोर अधोरेखित करण्यात आले.