वेंगुर्ले : प्रतिनिधी
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या “गणित प्रज्ञा “परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. संस्कृती सुदेश चिपकर हिने “सिल्वर मेडल” प्राप्त केलेले आहे. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रज्ञा परीक्षेत उज्वल यश संपादन करून शाळेच्या गौरवशाली इतिहासात मानाचा तुरा रोवून शाळेची उज्वल यशाची परंपरा अबाधित राखलेली आहे.
या परीक्षेसाठी आपल्या शाळेतील गणित विषयाच्या अध्यापिका श्रीमती. तृणाली माळकर मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या उज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भिसे मॅडम, संस्था चेअरमन आदरणीय श्री. विरेंद्रजी आडारकर साहेब, संस्था उपाध्यक्ष श्री. रमेश पिंगुळकर साहेब, संस्था सचिव श्री. रमेश नरसुले साहेब तसेच सर्व संस्था कार्यकारणी सदस्य यांच्यावतीने यश प्राप्त विद्यार्थीनी कुमारी. संस्कृती सुदेश चिपकर, मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती. तृणाली माळकर मॅडम तसेच पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.













