लेखक मिलिंद कदम यांना ‘अजेय लेखणी’ पुरस्कार जाहीर

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील लेखक, सामाजिक कार्यकर्ते तसेच गुहागर पंचायत समितीतील कनिष्ठ लेखाधिकारी मिलिंद कदम यांना मुंबई येथील आर्या रवी एंटरटेनमेंटच्यावतीने ‘अजेय लेखणी’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
आर्या रवी एंटरटेनमेंटतर्फे प्रतिवर्षी राज्यातील विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांचा त्यांच्या उल्लेखनिय योगदानाबद्दल पुरस्काराने गौरव केला जातो. चिपळुणातील खेरशेत गावचे सुपुत्र असलेले मिलिंद कदम हे शासकीय नोकरी करीत असतानाच सामाजिक कार्यात झोकून काम करीत आहेत. याबरोबरच वृत्तपत्रांतून विविध विषयांवर परखड लेखन करीत समाज जागृतीचे काम ते करीत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आर्या रवी एंटरटेनमेंटतर्फे यंदाच्या ‘अजेय लेखणी’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला जाणार आहे. मिलिंद कदम यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लवकरच मुंबई येथील एका खास समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.