चिपळूण अर्बन बँकेतर्फे विविध विभागात यश प्राप्त केलेल्या मान्यवरांचा सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : गेली चार दशके रंगभूमीवर कार्यरत असणारे सर्वांना परिचीत असे चिपळूण येथील नामवंत कलावंत प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना नाटय परिषदेच्या वतीने कै.राजाराम शिंदे पुरस्कृत ”नाटय मंदार पुरस्कार” त्यांना नुकताच प्राप्त झाला आहे. केवळ अभिनयच नाहीत तर दिग्दर्शन, लेखन, नपेथ्य, संगीत या क्षेत्रात सुध्दा त्यांचे प्राविण्य आहे. त्यांना ८ राज्यस्तरीय व ३ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचा चिपळूण अर्बन बँकेतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.
सब लेफ्टनंट कु.हरिज्ञा लक्ष्मण शिंदे ओवळी गावातील बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण उर्फ एल.के.शिंदे यांच्या जेष्ठ कन्या. कु.हरिज्ञा शिंदे हिची भारतीय नौदलाच्या ”सब लेफ्टनंट” यापदावर निवड झाली आहे. कु.हरिज्ञा हिचे आजोबा कृष्णाजीराव शिंदे व मोठे चुलते मनोहर शिंदे हे सैन्यात कार्यरत होते. सैन्यात सामिल होण्याची शिंदे कुटुंबाची परंपरा आहे. हरिज्ञाने डिबीजे महाविदयालयातून बारावी, बीकॉम करताना पुण्यातील चाणक्य ॲकॅडमी स्पर्धा परिक्षेची तयारी केली. नेव्हीत भरती करीता पदवी आवश्यक असल्याने मंदार महाविद्यालयातून एमबीए पुर्ण केले. केरळ येथे एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आता त्यांची निवड झालेली आहे. यापदावर पोहोचणारी कु.हरिज्ञा ही चिपळूण तालुक्यातील पहीली महीला अधिकारी आहे. कु.हरिज्ञा शिंदे हिचा येथोचित सन्मान बँकेच्या वतीने करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ द्वारे घेण्यात आलेल्या बिझनेस लॉ या विशेष विषयात एल.एल.एम. पदव्युतर परिक्षेत ॲड.दामिनी प्रशांत देवळेकर यांनी यश संपादन केलेले आहे. ॲड.दामिनी देवळेकर यांनी संपुर्ण कायदा विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. वकीलीची एल.एल.बी. पदवी पुण्यातील एस.सी.एल.सी कॉलेजमधून पुर्ण केली आहे. त्यांचा येथोचित सन्मान बँकेच्या वतीने करण्यात आला.
चिपळूण शहरातील प्रख्यात वकील व पेठमाप येथील रहीवाशी ॲड.जीवन रेळेकर व चिपळूण अर्बन बँकेच्या विद्यमान संचालिका सौ.गौरी रेळेकर यांचे चिरंजीव कु.प्रथमेश हे वकीली परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा येथोचित सन्मान बँकेच्या वतीने करण्यात आला. चिपळूण अर्बन बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे संचालक विराज उर्फ राजा दळी यांच्या गुरूकृपा भांडार या फर्मला भात बियाणे विक्रीचा महाराष्टात १ नंबरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुळातच मॅकेनिकल इंजिनिअर असलेले पण शेती क्षेत्राची आवड असल्याने ते या क्षेत्राकडे वळले आणि त्यांनी या क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. त्यांचा येथोचित सन्मान बँकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष रहिमान दलवाई, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सतीश आप्पा खेडेकर, बँकेचे संचालक मंडळ सदस्य तसेच एल.के.शिंदे, प्रशांत देवळेकर व बँकेचा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते