आचरा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात असताना कणकवली बांधकरवाडी येथील कोरल अपार्टमेंट रहिवाश्यांनीही स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला स्वच्छतेची कास धरत संपूर्ण सोसायटी परीसर स्वछ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत कोरल अपार्टमेंटचे
दत्ता डेगवेकर, दळवीकाका, अर्जुन बापर्डेकर,यश राणे, सुभाष पांडे,सुधाकर मेस्त्री, बावकर,सविता डेगवेकर,ज्योती घाडीगांवकर,आर्या करंबेळकर, प्रिया पाचकूडे, यांसह छोटी मंडळी स्वानंद करंबेळकर,गौरी मुणगेकर, वृद्धी घाडीगांवकर, वेदान्त बापर्डेकर,निधिश पालव, आदी सहभागी झाले होते.












