खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची सुवर्ण परंपरा कायम

राज्य, जिल्हा आणि तालुका गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार संग्राम प्रकाश भंडारे यांनी राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळवून विद्यालयाचा नावलौकिक उंचवला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार संग्राम प्रकाश भंडारे यांनी राज्य गुणवत्ता यादीत मानाचा 8 वा क्रमांक पटकावत संपूर्ण शाळेचा गौरव वाढविला. हा क्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रचिती धनंजय कुंभार ग्रामीण सर्वसाधारण, जिल्हा गुणवत्ता यादीत १२ वा क्रमांक, अब्दुल मेहबूब मुल्ला ग्रामीण सर्वसाधारण, ३० वा क्रमांक,आर्यन रविंद्र करांडे ग्रामीण सर्वसाधारण, ४१ वा क्रमांक, ज्ञानदा सतीश खताल ग्रामीण सर्वसाधारण, ९६ वा क्रमांक,स्वरा राम रहाटे ग्रामीण सर्वसाधारण, १०८ वा क्रमांक, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत साहिल संजय पवार ग्रामीण सर्वसाधारण, जिल्हा गुणवत्ता यादीत १७ वा क्रमांक,तनिष्का सुरेश जाधव १९ वा क्रमांक, रिया राजेश कदम २९ वा क्रमांक, आर्यन संतोष कलकुटकी ३७ वा क्रमांक ,श्रेयांश अमित वनगे ५३ वा क्रमांक,पुष्कराज रोहित गमरे ६१ वा क्रमांक, प्रसाद अजित भोसले ६४ वा क्रमांक, श्रुती प्रणय मोहिते ७५ वा क्रमांक, कस्तुरी महेश महाडिक १०७ वा क्रमांक,सह्याद्री अविनाश जाधव ११३ वा क्रमांक, अनुष्का सुभाष दरंदले ग्रामीण सर्वसाधारण, तालुक्यात २ री,अथर्व गणेश चाळके ग्रामीण सर्वसाधारण, तालुक्यात ३ रा, सुरज हरिश्चन्द्र चौरसिया ग्रामीण सर्वसाधारण, तालुक्यात ४ था,अगस्ती सुरेश जाधव ग्रामीण अनुसूचित जाती, तालुक्यात १ ली यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव- सम्राट विजय पाटील (ऑफिसर, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स, भारत सरकार) व सौ. स्वरा सावंत (अध्यक्ष, स्वामींनी सामाजिक कौशल्य विकास संस्था) यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना आनंद भुवड, सतिश पालकर, सौ. प्राजक्ता खेडेकर, शर्मिला म्हादे, पुष्कर कानिटकर, अश्विनी सावर्डेकर, सौ.स्मिता भालेकर, सौ.स्नेहल भोसले, सौ. श्वेता मोरे, अनंत डिके, मुसा काद्री, समिर पिलवलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालक प्रतिनिधी राम रहाटे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक आणि त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना देत शिक्षकांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक संजय वरेकर यांनी विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे अथक मार्गदर्शन यामुळेच हे घवघवीत यश मिळाल्याचे सांगत भविष्यातही गुणवत्तेची ही परंपरा अधिक बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला सम्राट विजय पाटील ऑफिसर मिनिस्टर ऑफ युथ अफेयर्स अँड स्पोर्ट गव्हर्मेंट ऑफ इंडिया, सौ. स्वरा सावंत स्वामींनी सामाजिक कौशल्य विकाससंस्था अध्यक्ष उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप, पर्यवेक्षिका सौ. सावंत, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.