बुधवारी खा. शरद पवार आझाद मैदानावर !

अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मदतीला महाराष्ट्राचा सह्याद्री

गौरव पोंक्षे | माखजन
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकाना वाढीव टप्पा अनुदान द्या ह्या मुख्य मागणी साठी आझादमैदान मुंबई येथे २२ जून पासून आंदोलन सुरु आहे.

हे आंदोलन निर्णायक् स्थितीवर येऊन ठेपले आहे. थेट शिक्षकांच्या मदतीला खासदार शरदचंद्र पवार मदतीला धावून आले आहेत. याआधीच रोहित पवार यांनी प्रश्न मिटेपर्यंत मी ठाम पणे शिक्षकांच्या पाठीशी उभा असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर खा. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांची शिक्षक समन्वय संघाच्या टीमने सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून भेट घेतली. सदरील भेटीदरम्यान आज आझाद मैदानावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिक्षकांबाबत व त्यांच्या प्रमुख प्रश्नांबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नासाठी मैदानावर येणार असल्याचे त्यांनी सदरील प्रश्ना बाबत स्वतः मुख्यमंत्री यांच्यासोबत भेटी घेऊन हे विषय कायमचे मार्गी लगावा, या प्रश्नांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये,याबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे सागितले.

यावेळी आमदार रोहित पवार, खंडेराव जगदाळे, ज्ञानेश चव्हाण अनिल परदेशी संतोष वाघ शिवराम मस्के संजय डावरे कर्ततारसिंग ठाकूर प्रा.अमरसिंह खांडेकर येरेकर, अंकुश शेंडोकार, भूपेंद्र पाटील इत्यादी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक उपस्थित होते.