शेतीविषयक माहिती देत राबविले विविध कार्यक्रम
वैभववाडी | प्रतिनिधी : शेतीच्या समृध्दीसाठी शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे, याकरिता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय, सांगुळवाडी येथील विद्यार्थ्यांनी करूळ येथे ‘इन्फॉ- रमेशन कॉर्नर’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .याद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसंबधी माहिती व शेतातील अडचणी व त्यावरील उपाय, शेतकरी यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, बागायती शेती, पशुपालन, फळबाग लागवड व सरकारी योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाचे कृषीदूत अभिजित जाधव , अवधूत पोळ, अनिकेत झांबरे, इंद्रजित मोरे , युवराज पाटील, आकाश चव्हाण, प्रविण हजारे , युवराज हिवरकर, विशाल गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. कामतेकर, कार्यक्रम समन्वयक पी. एस. सावंत, प्राध्यापक पी. डी . काळे, सहाय्यक प्रा. पी. एम. कणसे, प्रा. एन. आर. फुटाणकर, प्रा. एस. व्ही. जुवेकर, प्रा. बी. एस. सावंत, प्रा. एम. डी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, रमेश पांचाळ, कृषी सल्लागार विवेक कदम, रमेश कोलते, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










