कोकण पदवीधरचे उमेदवार निरंजन डावखरे यांना ऑल इंडिया धनगर महासंघाचा जाहीर पाठिंबा

 

आमदार नितेश राणे यांच्याकडे पाठींब्याचे पत्र नवलराज काळे यांनी केले सुपुर्द

वैभववाडी | प्रतिनिधी : कोकण पदवीधर मतदारसंघातून उभे असलेले महायुतीचे उमेदवार आ. निरंजन डावखरे यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. पाठिंब्याचे पत्र ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली, महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज काळे यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे दिले आहे.

 

कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा पाठिंबा देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. उमेदवार निरंजन डावखरे हे धनगर समाजाती विद्यार्थ्यांना न्याय देतील तसेच पदवीधर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आपल्याकडून न्याय मिळेल अशी इच्छा पत्रातून त्यांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे या पाचही जिल्ह्यातील महासंघाचे जिल्हा अध्यक्षांच्या अनुमतीने कोकण पदवीधर निवडणुकीत हा पाठिंबा जाहीर करत आहोत असे पत्रात नवलराज काळे यांनी म्हटले आहे.