पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
लांजा (प्रतिनिधी) पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील आसगे ग्रामपंचायतीचे सरपंच , सदस्य व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सदरचा पक्ष प्रवेश कार्यक्रम हा पाली येथे पार पडला. यावेळी आसगे ग्रामपंचायत सरपंच सौ. अनुष्का गुरव तसेच आसगे ग्रामपंचायत सदस्या सौ.सुषमा टोळे, सौ.सुजाता भारती, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे तसेच दत्ताराम टोळे, रामचंद्र टोळे, नारायण पांचाळ, संतोष टोळे, प्रकाश टोळे,चंद्रकांत टोळे, जयदीप टोळे , चंद्रकांत खंडागळे ,संदेश टोळे ,शांताराम टोळे,सुरेश टोळे, शिवराम टोळे, संतोष कांबळे ,नितेश टोळे, प्रशांत खैर, संजय पांचाळ, दिनेश टोळे ,महेश मांडवकर, प्रतीक पांचाळ, संदीप मांडवकर ,मकरंद शिंदे, अनिल गुरव ,स्वप्निल गुरव, आत्माराम गुरव, तुकाराम गुरव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पक्षाची शाल घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नवनिर्वाचित उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, शहरप्रमुख सचिन डोंगरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.











