बांदा : प्रतिनिधी
बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शुक्रवार १७ जुलै पासुन प्रारंभ होत आहे. यानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २४ जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून शनिवार २५ रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. बुधवार २९ रोजी गोपाळकाला होणार आहे.
सप्ताहाचे पार , विभाग व पारप्रमुख पुढील प्रमाणे आहेत. शुक्रवार आळवाडा – विनीत पडते, शनिवार देऊळवाडी – श्रीप्रसाद वाळके, रविवार गांधी चौक – सुदन केसरकर, सोमवार निमजगा – गवळीटेंब – संदेश पावसकर, मंगळवार हॉस्पिटल कट्टा – उमेश काणेकर, भाई शिरसाट, बुधवार मारुती गल्ली – दत्तप्रसाद पावसकर, गुरुवार उभाबाजार – निलेश महाजन.
शुकवार १७ रोजी सकाळी १२ वाजता श्री विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांच्या उपस्थितीत वीणा घेऊन सप्ताहास सुरुवात होईल. शुक्रवार २४ रोजी दुपारी १२ वाजता सप्ताहाची सांगता होईल.
सप्ताहा निमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० स्थानिक महिलांची भजनसेवा व रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.
———












