पेडणेकर ज्वेलर्सची सावंतवाडी शाखा ठरली ‘सुवर्ण वारसा’ पुरस्काराची द्वितीय मानकरी 

संस्थेच्या एकूण २५ शाखांमधून दुसरे मानकरी होण्याचा बहुमान

सावंतवाडी । वार्ताहर :जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सतर्फे संस्थापक स्व. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या कार्याचा आणि मूल्यांचा गौरव जपण्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सुवर्ण वारसा पुरस्कार २०२६’ यंदा पेडणेकर ज्वेलर्सच्या सावंतवाडी शाखेला प्रदान करण्यात आला. संस्थेच्या एकूण २५ शाखांमधून या पुरस्काराचे दुसरे मानकरी होण्याचा बहुमान सावंतवाडी शाखेने मिळवला असून, यामुळे शाखेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पुरस्कारामुळे सावंतवाडी शाखेने ग्राहकसेवा, विश्वास, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यपद्धती यांची जपलेली परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सिंधुदुर्ग व गोवा विभागाचे एरीया मॅनेजर अजित खैरे, स्टोअर मॅनेजर संयोगिता उगवेकर आणि संपूर्ण स्टाफने आनंद व्यक्त करत आनंद जगन्नाथ पेडणेकर व पेडणेकर कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, “ग्राहकांनी दाखविलेला विश्वास, प्रेम आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच आम्हाला हा सन्मान मिळवता आला. हा पुरस्कार आमच्या प्रत्येक ग्राहकाचा आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

सावंतवाडी शाखेच्या या यशामुळे संपूर्ण टीमचा उत्साह अधिक वाढला असून, भविष्यातही ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. संस्थापक स्व. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या आदर्शांचा वारसा जपत ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पेडणेकर ज्वेलर्सची वाटचाल अशीच अविरत सुरू राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.