शिक्षक समिती खेडच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात; ३०० गुणवंतांचा सन्मान

खेड, प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, खेड शाखेच्या वतीने आयोजित विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल, भरणे येथे संपन्न झाला. तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सुमारे ३०० विद्यार्थी तसेच गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, माजी चेअरमन सुनील सावंत, कोकण विभाग प्रमुख रुपेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश भागणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे, मोहाने हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय नायकल तसेच जिल्हा कार्यालय चिटणीस मुकुंद वाजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या गुणगौरव सोहळ्यात शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, बीडीएस, मंथन, दहावी, बारावी, जेईई, नीट तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या शिक्षकांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, कला, क्रीडा आणि इतर विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणारे शिक्षक तसेच नूतन केंद्रप्रमुख यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबत सामाजिक बांधिलकीही जपावी, तर शिक्षकांनी आधुनिक शिक्षणपद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन नरेश ठोंबरे यांनी केले, तर सचिव धर्मपाल तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, नवनीत घडशी, अनिल यादव, शैलेश पराडकर, दिलीप यादव, श्रीकृष्ण खांडेकर, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, नरेश ठोंबरे, संजय सुर्वे, सुनील पांगुळ, दिनेश पवार, प्रमोद कदम, भागोजी कडव, महेंद्र शिंदे, चंद्रकांत पवार, अनंत शिंदे, अजय साबळे, अशोक पाटील, विजय कासार, शशिकांत भुवड, नारायण शिरकर, बबन मोरे, अनिल आंजर्लेकर, कृष्णा पवार, गजानन पालांडे, सुरसिंग ठाकरे, राजाराम दरेकर, सचिन गावडे, भरत बोडके, सतीश गजमल, अनंत मोरे, सुनील जंगम, रोहन देवकते, सुविधा सावंत, दीप्ती यादव, स्नेहल बामणे, अंकिता भोसले, सरला मावळी, शर्वरी भोसले, किरण जानकर, रश्मी कोलगे, ऋतुजा तांदळे, विधी बने, दीपाली पालवे, सुजाता चाळके, रसिका रेवाळे, अनुराधा शिंदे, पूजा भावे, रश्मी पालांडे, कल्याणी कासार, सुनिता तांदळे पाटकर, मंगल थोरात आदींनी परिश्रम घेतले.