सावंतवाडी : येथील इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडे ची विद्यार्थिनी कु. प्रांजल अनिल जाधव हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित शिष्यवृत्ती इयत्ता ८ वी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रांजलच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे. तिच्या मेहनतीला, चिकाटीला आणि सातत्यपूर्ण अभ्यासाला हे यश मिळाले आहे.
या यशस्वी विद्यार्थिनीचे शाळेच्या CEO सौ. मैथिली नाईक मुख्याध्यापिका सौ. प्रणिता मयेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रांजलचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.











