पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे केले श्रवण

कणकवली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधत विविध राष्ट्रीय, सामाजिक आणि प्रेरणादायी विषयांवर विचार मांडले. त्यांच्या संदेशातून राष्ट्रनिर्माण, जनसहभाग आणि देशसेवेची प्रेरणा देण्यात आली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट श्रवण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी विचारांतून देशसेवेची नवी ऊर्जा आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.