आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथे उद्या साई पालखीचे आगमन; पूजन व दर्शनाचे आयोजन

​सावंतवाडी:
सालाबादाप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईबाबांच्या पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता या श्री साई पालखीचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ या निवासस्थानी आगमन होणार आहे.

​पालखीचे आगमन झाल्यानंतर आमदार श्री. दीपकभाई केसरकर आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती पल्लवीवहिनी केसरकर यांच्या शुभहस्ते श्री साई पालखीचे पूजन व आरती संपन्न होणार आहे. या धार्मिक व उत्साही पूजन सोहळ्यास पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण आमदार दीपकभाई केसरकर यांच्यावतीने देण्यात आले आहे.

​तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ही श्री साई पालखी पुढील प्रवासासाठी माडखोल येथे रवाना होणार आहे. तरी या दोन्ही दिवशी आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांचा आणि पालखी सोहळ्याचा लाभ सर्व साई भक्तांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.