चांगल्या कामगिरीबद्दल सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉ. फडके व डॉ. पागरकर यांचा भाजपाकडून करण्यात आला सत्कार..

रत्नागिरी : सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टर श्री. विजय अनिरुद्ध फडके, (न्यूरोसर्जन) व त्यांचे सहाय्यक डॉ. फरयाल पागरकर (MBBS) यांनी मा. फुले मॅडम सिव्हिल सर्जन यांचे मार्गदर्शनाने गेले आठ दिवसात दोन क्लिष्ट शस्त्रक्रिया केल्या. दत्ताराम शेलार वय ८२ यांचा पूर्ण पाय निकामी झाला होता. त्यांची शस्त्रक्रिया करून पाय पूर्ववत केला त्याच बरोबर प्रदीप जाधव वय 43 यांचे बारा तास मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली. या दोनही ऑपरेशन मध्ये रुग्ण आपल्या पूर्ववत स्थितीत येत असून डॉ. फडके व डॉ. पागरकर यांनी एक प्रकारे त्यांना जीवदानच दिले आहे.
या डॉक्टरांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या त्यांच्या कार्याबद्दल समाजाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजेश सावंत यांनी फुले मॅडम यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला व दाखवून दिले की चांगले काम होत असताना पक्षाकडून गौरवही केला जातो.
याप्रसंगी सतेज नलावडे बाबू पाटील, नंदू केदारी, दादा ढेकणे, संकेत कदम, मंदार खंडकर पुंडलिक पावसकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. त्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये रुग्णांना किंवा नातेवाईकांना काही अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे ही आव्हान केले आहे.