खेडमधील तिघांची विभागीय तायक्वाँदोसाठी निवड

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील चिंचघर येथील एस. एम. फाऊंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस. एम. इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यांची विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शालेय क्रीडा विभागामार्फत डेरवण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेच्या १९ वर्षाखालील मुलींच्या ५५ किलो वजनी गटात अदिबा परकार, ५९ किलो वजनी गटात जिया बेबल यांनी तर १७ वर्षाखालील मुलांच्या ७८ किलो वजनी गटात मोहम्मद फुरकान नाडकर याने सुवर्णपदक पटकावला. त्यांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तिघांना क्रीडाशिक्षक अजय निगडेकर, अनेश पडवळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष कय्युम नाडकर यांच्याहस्ते यशस्वी खेळाडूंचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.