डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न

मंडणगड | प्रतिनिधी: येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2023 रोजी MKCL चे सेंटर,’ डिजिटल कॉम्प्युटर्स’ यांच्यातर्फे प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा आठवी ते दहावी अशा तीन गटात घेण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
इयत्ता दहावी १)तन्वी शिगवण ‘अ’ २)सलोनी तांबे ‘ब’ ३)कल्याणी जोंधळे ‘क’ इयत्ता नववी १)प्रचिती यादव ‘अ’ २)सुरेखा शेळके ‘ब’ ३)यशश्वी पातेरे ‘क’
इयत्ता आठवी १) आर्यन गर्जे ‘अ’ २) सोनिया शिकवण
‘ब’ ३)मयूर गणवे ‘ क ‘या विद्यार्थ्यांना अनुक्रमे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे ,पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर ,
डीजीटेक कम्प्युटर्स चे प्रमुख व
व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.शशिकांत चोरगे, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ शेडगे, शिक्षक प्रतिनिधी सौ. स्वरा देवघरकर, ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनील घोसाळकर ,ज्येष्ठ शिक्षिका सौ. योजना शेट्ये, क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण, कलाशिक्षक श्री. रामचंद्र धुमाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक चांगला उपक्रम राबवून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल, ‘डिजीटेक कम्प्युटर्सचे’ आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.