भातगाव फाटा येथे थांबलेल्या बसला ट्रकची मागून धडक; बसचालक जखमी

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील भातगाव फाटा येथे थांबलेल्या एसटीला ट्रकची पाठीमागून धडक बसून अपघात झाला.या अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना गुरुवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8.25 वा.घडली आहे.
अमित रविंद्र चव्हाण (रा.विजापूर,कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.त्याच्या विरोधात एसटी वाहकाने तक्रार दिली आहे.त्यानुसार,गुरुवारी सकाळी ते आणि एसटी चालक सचिन सावंत आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-06-एस-9558) घेउन निवळी ते जयगड जाणार्‍या रस्त्यावरील भातगाव फाटा येथे थांबलेले होेते.त्याच सुमारास अमित चव्हाण आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-09-एफएल-7135) घेउन पाठीमागून येत असताना त्याने उभ्या एसटीला पाठीमागून धडक देत अपघात केला.यात एसटी चालक सचिन सावंत किरकोळ जखमी झाले आहेत.याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279,337 आणि मोटार वाहन कायदा 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.