बांदा : प्रतिनिधी
बांदा – उभाबाजार येथील शितल पांडुरंग बांदेकर (वय ४६) यांचे दीर्घ आजाराने उपचारा दरम्यान गुरूवारी दुपारी निधन झाले. गुरूवारी रात्री बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, सासू, दिर, वहिनी, नणंदा असा परिवार आहे. बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळ सदस्य पांडुरंग बांदेकर यांच्या त्या पत्नी होत.













