लांजा शहरातील दोन युवकांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एकमेकांना शिवीगाळ दमदाटी व भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी शहरातील दोघा युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लांजा ओझर येथील सार्वजनिक रोडवर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत सिकंदर कांबळे (वय ३४, राहणार लांजा बौद्धवाडी) आणि अमित बबन जाधव (वय ३१, राहणार न्हावीवाडी लांजा) हे दोघेजण आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लांजा ओझर येथील सार्वजनिक रोडवर एकमेकांना शिवीगाळ, हाताच्या थोपटाने मारहाण तसेच दमदाटी करून, भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी या दोन्ही युवकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर हे करत आहेत












