सिंधुदुर्ग:
दि. ७/८/२०२६ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त, सिंधुदुर्ग जिल्हा यांनी उद्यानविद्या महाविद्यालय यांचे मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. या प्रक्षेत्रावरील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्या कार्यालयातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे जिल्हा समन्वयक श्री. बहर महाकाळ, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्री. गणेश टेमकर, श्रीम. उत्कर्षा किर, श्रीम. तृप्ती जाधव श्रीम. भक्ती पेजे, श्रीम. सोनल तोडणकर, श्रीम. शीतल कांबळे हे अधिकारी देखील उपस्थित होते.
या सर्वांना प्रकल्प प्रमुख, श्री. कल्पेश मधुकर शिंदे यांनी या केंद्राचे मत्स्य व्यवसाय विकासातील योगदान सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल तसेच विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या चांदा ते बांदा, सिंधुरत्न या योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग याबाबत संबंधितांना अवगत केले.
या केंद्राचा वार्षिक बीजोत्पादन कार्यक्रम केंद्राचे प्रमुख श्री. कल्पेश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग तसेच त्यांचे अधिकारी वर्ग यांनी देखील भारतीय प्रमुख कार्प रोहू व कटला प्रजातीच्या नर आणि मादी माशांना त्यांच्या वजनाप्रमाणे प्रेरित इंजेक्शनचा डोस दिला. यावेळी त्यांच्या मत्स्यमहाविद्यालयीन जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. तसेच मत्स्यमहाविद्यालयीन विद्यार्थी आणि मत्स्यशेतकरी यांना एकाच छताखाली मत्स्यसंवर्धनाची माहिती आणि प्रात्यक्षिके करण्याची संधी मिळणे हेच खरे विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या निधीचा विनियोग अगदी सार्थकी झाल्याचे प्रतीक असल्याचे नमूद केले. सदरचे केंद्र हे मत्स्य संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुखी तसेच विविध नावीन्यपूर्ण घटकांचा समावेश असून मनुष्यबळाची कमतरता असताना देखील चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये शासकीय विभाग म्हणून या केंद्रास या केंद्रासाठी आवश्यक असलेली सर्वतोपारी मदत करण्यात येईल अशी ग्वाही सहा. आयुक्त यांनी दिली. उपस्थित मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी त्यांना एक सुखद आणि प्रेरणादायी अनुभव मिळाला आणि याचा भविष्या मध्ये आम्हाला नक्कीच फायदा होईल असे उद्गार काढले व केंद्राच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. विनय सहस्त्रबुध्दे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,श्री. दिपक वाघ तांडेल, श्री. सत्यवान मालोंडकर, कुशल मासेमार, कंत्राटी कर्मचारी वर्ग श्री.पंकज गावडे, कार्यालय सहाय्यक, श्रीमती समिक्षा अणसुरकर, श्री. संदिप सावंत, श्री. सुभाष सावंत,श्री. पांडूरंग कासवेकर, श्री. प्रज्योत पणदूरकर आणि श्री.
सर्वेश धुरी, मत्स्य अभियांत्रिकी पदविका धारक यांनी सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास अनमोल असे सहकार्य केले.
Home महत्वाच्या बातम्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग यांची मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय...












