देवगड स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षपदी ललित योगेश चांदोसकर

विविध क्रीडा प्रकारांत देवगड तालुक्याला मानाचे स्थान मिळवून देण्याचा संकल्प

खेळाडूंना व्यासपीठ आणि प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविणार

देवगड : देवगड तालुक्यातील युवकांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने देवगड स्पोर्ट्स क्लबची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देत विविध खेळांमध्ये देवगडला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी क्लबच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष ललित चांदोसकर यांनी सांगितले. देवगड स्पोर्ट्स क्लबची २०२६-२७ या वर्षाची कार्यकारिणी आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. यावेळी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवगड स्पोर्ट्स क्लबच्या २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी ललित चांदोसकर, उपाध्यक्षपदी सोहम पारकर, सरचिटणीसपदी किरण पाटील, सहचिटणीसपदी शुभम कुलकर्णी, खजिनदारपदी स्वानंद वायगणकर, सहखजिनदारपदी सिद्धेश घाडी, तर संचालकपदी शुभम सूर्यवंशी, प्रणय केळुसकर आणि रिजवान मेमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

क्लब समितीमध्ये सोशल मीडिया प्रमुख सूरज खरात, जनसंपर्क व विपणन प्रमुख ऋतिक धुरी, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी प्रमुख आदित्य तावडे, प्रतीक लोके आणि गौरव कांदळगावकर, ग्राफिक डिझायनर प्रमुख सौरभ कोयंडे, इव्हेंट समन्वयक सौरभ माने, प्रायोजकत्व प्रमुख जीवन रामाणे, निधी संकलन प्रमुख शुभम घेवारी, मर्चंडाईज प्रमुख जयेश पारकर आणि चिन्मय खानविलकर, वैद्यकीय प्रमुख सागर पडवळ, कायदेविषयक सल्लागार आशिष लोके आणि स्वयंसेवक समन्वयक शिवम कणेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

क्रीडानिहाय जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. कबड्डी समन्वयक म्हणून विनायक सांगळे, मॅरेथॉन प्रमुख म्हणून रोहन घोगरे, सायक्लोथॉन प्रमुख म्हणून आदित्य हिरलेकर, बॅडमिंटन प्रमुख म्हणून अभिराम देसाई, व्हॉलीबॉल प्रमुख म्हणून महेश वायंगणकर, वेटलिफ्टिंग प्रमुख म्हणून सायली घारे, पॉवरलिफ्टिंग प्रमुख म्हणून समर्थ भावे आणि ओंकार कुबडे, बुद्धिबळ समन्वयक म्हणून अभिषेक संगाळे आणि आपटे, कॅरम समन्वयक म्हणून मेषक राणे, तायक्वांदो व ज्युदो प्रमुख म्हणून लाजरी नालवडे, टेबल टेनिस प्रमुख म्हणून प्रणव पारकर, खो-खो प्रमुख म्हणून सिद्धेश घाडी आणि जलतरण प्रमुख म्हणून प्रणय कोयंडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

देवगड परिसरातील युवकांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा संस्कृतीला चालना देणे तसेच विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करणे, या उद्देशाने आगामी वर्षात देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळावी आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, यासाठी क्लब कार्यरत राहणार आहे.