परूळे येथे ऑल इंडिया एअरपोर्टस् एव्हिएशन एम्प्लॉईज कार्यकर्ता मेळावा संपन्न…
परुळे : प्रतिनिधी
कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय राहीला तर त्यांचा फायदा कामगारांना होणार आहे. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनेवर युनियन होऊ नये यासाठी मी प्रयत्न करीत असतो. परंतु सिंधुदुर्ग विमानतळ सुरुवात झाल्यावाचून माझ येथे येणे झाल नाही, त्यामुळे कामगारांना युनियन कराव लागल याची खंत आहे. विमानतळ प्रकल्प व्यवस्थापन सुध्दा फायद्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे कामगारांना सुधा व्यवस्थापन बरोबर समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे असे मत आमदार दीपक केसरकर यांनी परूळे ग्रामपंचायत हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया एअरपोर्टस् एव्हिएशन एम्प्लॉईज कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
परूळे चिपी सिंधुदुर्ग विमानतळ सपोर्ट स्टाफ युनियन कार्यालयचे उद्घाटन परुळे बाजार येथे संपन्न झाले यावेळी माजी शिक्षण आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते कार्यालय चे उद्घाटन करण्यात आले यावेळी विभाग क्रमांक ७ सचिव कुणाल सरमळकर उपसभापती सचिन देसाई जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य काका कुडाळकर विनोद कांबळी संपर्क प्रमुख उत्तर मध्य मुंबई जितेंद्र जानवले चिपी माजी सरपंच गणेश तारी कोचरा सरपंच योगेश तेली भोगवे माजी सरपंच महेश सामंत आदी उपस्थित होते यावेळी परुळे ग्रामपंचायत सभागृहात कामगारांच्या विविध प्रश्नांवर व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमास, मा. आमदार श्री. दीपक केसरकर तसेच युनियनचे सरचिटणीस श्री. कुणाल सरमळकर उपस्थित होते
सिंधुदुर्ग विमानतळ युनियनचे अध्यक्ष तथा वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी युनियन सदस्य यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सिंधुदुर्ग विमानतळ सपोर्ट स्टाफ युनियनच्या उपाध्यक्षपदी चंद्रशेखर राणे आणि सचिवपदी गणेश तारी यांची निवड करण्यात आली











