वेंगुर्ले : प्रतिनिधी
सद्गुरू बाळू मामा भक्तांचा गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात कुडाळ- सरंबळ, कदंबवाडी येथील माजी सरपंच अजय कदम यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. या उत्सवात भाविक- भक्तांनी हर्ष उल्हासात या सोहळ्यात सहभाग घेतला.
या उत्सवा निमित्त धार्मिक, आध्यात्मिक व इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मानवंदना- गुरूदक्षिणा ( आईचे पाद्य पूजन) हा विशेष कार्यक्रम, वेतोरेतील ह.भ.प भाऊ नाईक यांचे मंत्रमुग्ध करणारे प्रासादिक कीर्तन, नामस्मरण, साधकांचे मनोगत, श्री.क्षेत्र माणगाव (उदय पार्सेकर संपादीत) महात्म्य ग्रंथाचे प्रकाशन , महाआरती, महाप्रसाद, विद्यार्थी गुणगौरव याज बरोबर संत्सग साधन मंडळ- सरंबळ कर्ली, श्रीब्राह्मण देव मंडळ- अणाव, श्रीदेवी सातेरी प्रासादिक महिला मंडळ प्रस्तुत कर्त्या आर्या कदम ) सरंबळ – कदंबवाडी यांचे महिला भजन आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. या भक्ती सोहळयाकरिता प्रवचनकार श्री. रामदास तेंडुलकर, अजय कदम त्यांच्या सहकारी, साधक भक्तांनी बहुमोल असे सहकार्य देऊन हा सोहळा यशस्वी केला. जि.प. सदस्य रूपेश पावसकर यांनी या कार्यक्रमात उपस्थित दर्शवली होती.









