४ विद्यार्थ्यांचा ६ मैदानी क्रीडा प्रकारात सहभाग
देवरूख (प्रतिनिधी):
‘रत्नागिरी डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन’ने एस. व्ही. जे. सी. टी’ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेल्या देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी २० वर्षाखालील गटात निवड झाली आहे. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत महाविद्यालयाचे ४ विद्यार्थी ६ क्रीडा प्रकारास सहभागी होणार आहेत. डेरवण येथे यशस्वी कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंची माहिती खालील प्रमाणे आहे.
१..सार्थक प्रकाश आडशे(१२वी वाणिज्य-ब)
गोळा फेक – प्रथम क्रमांक.
उंच उडी- द्वितीय क्रमांक.
२..साईराज उमेश आंब्रे(प्रथम वर्ष, वाणिज्य)
उंच उडी- प्रथम क्रमांक.
गोळा फेक- द्वितीय क्रमांक
३..चेतन सुरेश खामकर(द्वितीय वर्ष,कला)
८०० मी. धावणे- प्रथम क्रमांक.
४..व्यंकटेश प्रशांत इंदुलकर(द्वितीय वर्ष, वाणिज्य)
भालाफेक- प्रथम क्रमांक.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून, त्यांना राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.












