शिवरामराजे यांच्या जन्मशताब्दी व संस्थापक दिनाचे औचित्य
सावंतवाडी: लेफ्टनंट कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तसेच महाविद्यालयाच्या संस्थापक दिनानिमित्त श्री पंचम खेमराज (स्वायत्त) महाविद्यालय, सावंतवाडी आणि ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १:०० या वेळेत एस. पी. के. कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये पार पडणार आहे.
या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य भारमल सर आणि ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उप अधीक्षक दयानंद गवस सर यांनी केले आहे.
रक्तदानासाठी इच्छुक असणाऱ्या रक्तदात्यांनी अधिक माहिती आणि नोंदणीसाठी एनसीसी आर्मी प्रमुख डॉ. सचिन देशमुख (७८७५५८२८५०), राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. सुधीर बुवा (९४२२८१०२२६), ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सदस्य मंगेश माणगावकर (७४९८६२१२३५), कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे (९४२०७४०४४४), सचिव बाबली गवंडे (८३९०९०५२६९) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (९४२२९६७२४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












