विजयदुर्ग येथील दुर्गामाता सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ गुंड्याकाका देवरुखकर यांचे दुःखद निधन 

 

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) विजयदुर्ग येथील श्री दुर्गामाता कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ गुंड्याकाका देवरुखकर (वय ७२ वर्षे ) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. विजयदुर्ग एसटी आगारामधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःला धार्मिक आणि सामाजिक कार्यात झोकून दिलं होतं.

दुर्गामाता सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाच्या नवरात्र उत्सवात त्याचबरोबर विजयदुर्ग येथील राममंदिर उभारणीत त्यांचा फार मोठा मोलाचा हात होता. येथील विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या माघी गणेशोत्सवामध्ये ते क्रियाशील कार्यकर्ते म्हणून वावरत होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतण्या, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. देवरुखकर यांच्या निधनामुळे विजयदुर्ग भागामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.