कणकवली । प्रतिनिधी : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटच्या माध्यमातून डामरे गावामध्ये कृषी कन्यांनी केले मातीचे महत्त्व व पर्यावरण संरक्षण संदेश देणार्या प्रभातफेरीचे आयोजन केले होते. ही प्रभातफेरी मंगळवार १४ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
यामध्ये डामरे गावचे सरपंच, उपसरपंच, इतर ग्रामस्थ व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक ,मुख्याध्यापक उपस्थित होते. आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेत जनजागृती करण्याचे काम केले.
या प्रभातफेरी मधून कृषी मूलं जीवनम् ! हया तत्वाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विविध घोषवाक्ये देण्यात आली. ही प्रभातफेरी प्राचार्य पंकज संते, प्राध्यापक डॉ. रोहित शेलार, स्वराली म्हात्रे, पियुष शिर्के व योगेश जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यावेळी कृषी कन्या ऐश्वर्या ठाकूर, श्रेया पाटील, श्वेता जाधव, अंकिता चव्हाण, प्रमिता रायपुरे, प्रतिक्षा कोठावळे, प्रिती कांबळे, अदिती कांबळे, गौरी कोरे आदी उपस्थित होते.
Sindhudurg











