लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील श्री देवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळ प्रभानवल्ली खोरनिनको संचलित, आदर्श विद्यामंदिर,प्रभानवल्ली या प्रशालेत विद्यार्थी गुणगौरव ,बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला.
आदर्श विद्यामंदिर,प्रभानवल्ली मध्ये सुरुवातीला लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त प्रशालेत साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष मंगेश जाधव, संस्था कार्याध्यक्ष जितेंद्र ब्रीद संस्था सदस्य शशिकांत चव्हाण, उमेश पत्की (पंचायत समिती सदस्य) सौ मयुरी ब्रीद-पोलीस पाटील बनखोर ,माजी विद्यार्थी संघटना सचिव अतिश अनंत मानगेकर ,ग्रामपंचायत सदस्य बिलाल हकीम ,भूदाते, चंद्रकांत गुरव, सुरेश गुरव ,माजी तंटा अध्यक्ष साडविलकर ,पालक प्रतिनिधी राजेश प्रभूलकर व प्रशालेचे मुख्याध्यापक वैभव चौगुले व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रशालेसाठी दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बहुमूल्य बक्षीस योजना (५२,०००रु.) राबविणारे बाळकृष्ण वासुदेव गुडेकर, अरुण चव्हाण , नरेंद्र पाटोळे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बाळकृष्ण गुडेकर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ठाकूर यांनी केले. आभार श्री.राठोड यांनी केले













