कणकवलीत घरात शिरला अजगर!

सर्पमित्राने शिताफीने केले जेरबंद

कणकवली : शहरातील भालचंद्र महाराज संस्थान परिसरात एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. अजगर घरात दिसताच घरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र भुजंग राणे यांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी अत्यंत शिताफीने आणि सुरक्षित पद्धतीने अजगराला जेरबंद केले.

दरम्यान, अजगर पकडतानाचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्पमित्र भुजंग राणे यांच्या सतर्कतेमुळे अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडण्यात आले.