चिपळूण ब्राह्मण संघात १ सप्टेंबर रोजी मंगळागौर

चिपळूण (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूणच्या महिला विभागातर्फे तिसऱ्या श्रावण मंगळवारी म्हणजे दि. १ सप्टेंबर रोजी संघाच्या सभागृहात मंगळागौर पूजनाचे आयोजन केले आहे. ज्या ब्राह्मण नवविवाहितांचे मंगळागौर व्रत असेल त्यांनी संघात येऊन पूजन करावे.
पूजेला येताना आपल्याबरोबर पूजेला लागणारे पूर्ण साहित्य घेउन यावे. त्यात अन्नपूर्णादेवीची मूर्ती, देवीला ओटी, हळद, कुंकू, बुक्का, गुलाल, विड्याची पाने २०, फळे ५ प्रकारची, पत्री, कापसाची वस्त्रे, पंचामृत, निरंजन तूप वातीसह, काडेपेटी, पळी भांडे, ताम्हन, गूळखोबरे, नैवेद्यासाठी काही गोड, बांगड्या गळेसर. सुटी नाणी आणि गुरुजीना दक्षिणा असे आणावे.
आपण येणार असल्याची नोंद महिला विभागात करावी. त्यावेळी येण्याची वेळ, सायंकाळी खेळ, याची माहिती दिली जाईल. अधिकाधिक महिलांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन चिपळूण ब्राह्मण सहाय्यक संघाच्या महिला विभागाने केले आहे. पूजेला येणाऱ्यानी आपली नोंद सौ.रेखा बापट (९४२३९४४६६६), सौ. सुरंग अभ्यंकर (९४०३९३६५५६) या सदस्यांकडे करावी. पूजन करणाऱ्या महिलांनी तिसऱ्या श्रावण मंगळवारी म्हणजे १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता हॉलवर पूजा साहित्यासह उपस्थित रहावे.