चिपळूण (प्रतिनिधी) : युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सुरगुरोह आणि बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल लवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. .गोवळकोट रोड साजिद सरगुरोह संपर्क कार्यालय हिना अपार्टमेंट येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
या शिबिरात स्त्रियांचे आजार, मोफत इसीजी, मशीनद्वारे साखर तपासणी, मधुमेह, सांधेदुखी, नेत्र तपासणी, ऑक्सीजन लेवल रक्तदाब, पॅरलेसिस अन्य आजार तपासणी व सल्ला देण्यात येणार असून रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरात क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट तज्ञ डॉ. फिरोज पटेल उपस्थित राहणार आहेत. डायलेसिस रुग्णांना घरडा हॉस्पिटल लवेल येथील रुग्णालयात प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीसाठी ७२६१९६१२६६ या नंबरवर नावनोंदणी करावी, असे आवाहन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी केले आहे












