भाजपच्या ओबीसी सावंतवाडी मंडल अध्यक्षपदी धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर 

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी गेली अनेक वर्षे भाजप पक्षामध्ये कार्यरत असणारे धिरेंद्र म्हापसेकर यांची भाजपच्या ओबीसी सावंतवाडी मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ओबीसी सेलच्या माध्यमातून भविष्यात भाजप पक्ष विस्तारित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी धिरेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.