खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची मार्गदर्शक भूमिका
शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शक सुचनेनंतर आपण प्रशासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यातून रॉक गार्डन येथील वीज पुरवठ्यातील तांत्रिक समस्या दुरु करण्यात आली असून वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी दिली.
वीज मिटर व वीज तारा जळून गेल्याने रॉक गार्डन येथील वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा्यातील तांत्रिक कारणाने हा प्रकार सातत्याने घडत होता. याबाबत काही व्यवसायिकानी दोन दिवसांपूर्वी दीपक पाटकर यांची भेट घेतली. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची मागणी केली.

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटकर यांनी प्रशासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यातून नवीन वीज जोडणी व नवीन वीज मिटर जोडणी मंगळवारी करण्यात आली आहे. पुन्हा रॉक गार्डन रात्री विद्युत रोशणाई सह पर्यटकांना अनुभवता येणार आहे. तसेच पर्यटन व्यावसायिक यांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं असताना जनतेची सेवा याला प्राधान्य आहे. असे दीपक पाटकर यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी राजू बिडये, महेश सारंग, आबा शिर्सेकर, रोहन आचरेकर, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर यांसह अन्य पदाधिकारी व्यावसायिक उपस्थित होते.












