चिंदर नं. १ च्या विद्यार्थ्यांना मिळाले ‘स्पोर्टस् युनिफॉर्म’: नामदेव पाताडे यांचा कौतुकास्पद उपक्रम

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : जि. प. शाळा चिंदर नं. 1 च्या सर्व विध्यार्थ्यांना व शिक्षकांना कै. सुमित्रा सखाराम पाताडे यांच्या स्मरणार्थ नामदेव सखाराम पाताडे यांच्या वतीने स्पोर्टस् गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील दिनेश पाताडे, रावजी तावडे, सुनील पाताडे, जान्हवी घाडी, वेदिका घाडी, गिरीश पवार, नंदकुमार जुदळे, मुख्याध्यापक राजेंद्रप्रसाद गाड आदी उपस्थित होते. प्रशाला व शाळा व्यवस्थापन समिती कडून आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी तर आभार सचिन तवटे यानी मानले.