मसूरे येथील नारळ लढविणे स्पर्धेत प्रथम येसजी अजिंक्य!

शिवसेना मसूरे विभागाच्या वतीने आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर

शिवसेना जि.प. मसुरे विभागाच्या वतीने भव्य ‘आमदार चषक’ नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन अपूर्व उत्साहात मसुरे बाजारपेठ येथे करण्यात आले होते.

​या ​स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथम येसजी याने पटकावला. द्वितीय क्रमांक आदित्य हळदणकर, तृतीय क्रमांक सुजन मिठबावकर, चतुर्थ क्रमांक मनिष भोगले याने पटकावला. प्रथम चार क्रमांकाना अनुक्रमे ६ हजार ६६६ रुपये व चषक, ३ हजार ६६६ रुपये व चषक,
​तृतीय क्रमांक ६६६ रुपये, ​चतुर्थ क्रमांक ६६६ रुपये पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेत 140 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाट्न जि. प. सदस्या सौ क्षमा हडकर यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस समारंभ शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष विनायक बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला . यावेळी प. स. सदस्य छोटू ठाकूर, वेरली सरपंच धनंजय परब, मठबुद्रुक सरपंच बाळा वेंगुर्लेकर, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, निलेश बाईत, मसुरे माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, माजी उपसरपंच राजेश गावकर, उद्योजक दया देसाई, श्रावण माजी सरपंच प्रशांत परब, जितेंद्र परब,जुबेर सय्यद, सचिन आंगणे, तात्या हिंदळेकर, सिद्धेश मसूरकर, सचिन पाटकर, श्री पुरुषोतम शिंगरे, हिरबा तोंडवळकर, पियुष मसूरकर, सुयोग राणे, रुद्र मसूरकर, अवतार मसूरकर, सूरज मसूरकर, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुकध्यक्ष विनायक बाईत म्हणाले, ​खेळात हार-जीत होतच असते, पण सर्वात महत्त्वाची असते ती खेळाडूवृत्ती आणि आपला आपापसातील स्नेह! शिवसेना नेहमीच आपल्या परंपरा जपत, क्रीडा व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध राहिली आहे. छोटू ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले नियोजन या स्पर्धेचे केले आहे. पुढील वर्षीसुद्धा हि स्पर्धा आयोजित केली जाईल असे मनोगत त्यानी व्यक्त केले. सौ.क्षमा हडकर यानी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचलन बाबू आंगणे तर आभार पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यानी मानले.