राजापूर प्रतिनिधी : राजापुरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील आर्थिक व्यवहाराबाबत पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत यशवंत गुरव यांनी बुधवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेत याबाबत तक्रारीचे निवेदन त्यांना सादर केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्रकल्प अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे गुरव यांनी केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस अनुदानातून नव्याने नियुक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक होते. त्यासाठी दोन वेगवेगळ्या अनुदानातून प्रशिक्षणाचा निधी खर्च करणे अपेक्षित असताना, कार्यालयाकडून एकच कार्यक्रम घेऊन त्याच प्रशिक्षणाच्या नावाखाली दोन स्वतंत्र बिले सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रमाणक क्रमांक ५६, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी प्रशिक्षणासाठी ₹४३,६७०, तर अंगणवाडी सेविका/मदतनीस आणि पर्यवेक्षिका सत्कार खर्चासाठी प्रमाणक क्रमांक ५२ अन्वये ₹९९,६०० खर्च दाखविण्यात आला आहे. या दोन्ही खर्चाबाबत संशय व्यक्त करत यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची बदली करून चौकशी निष्पक्षपणे करावी अशी मागणी गुरव यांनी सीईओ वैदेही रानडे यांच्याकडे केली आहे.
Home महत्वाच्या बातम्या राजापुरातील एकात्मिक बाल विकास सेवा केंद्रातील आर्थिक व्यवहारावर प्रकरणी उपसभापती अभिजित गुरव...













