सुशील शेडगे यांची अध्यक्षपदी निवड!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील हडी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच श्री सुशील सावळाराम शेडगे यांची निवड ग्रामसभेत करण्यात आली. यावेळी सरपंच श्री प्रकाश तोंडवळकर, उपसरपंच भरत लाड, ग्राम. सदस्य भावेश सुर्वे, आनंद पांडुरंग रावले, सायली सुशील मिठबावकर, पोलीस पाटील दिनेश सुर्वे, तृप्ती हडकर, जान्हवी पांजरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेश सुर्वे, कृषी सेवक विवेक रंगे, ग्रामपंचायत अधिकारी युगल प्रभूगावकर, मुख्याध्यापक कांबळी आदी सह ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सुशील शेडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.