जखमी वीज कामगाराला कंत्राटी कामगार संघाची आर्थिक मदत

बांदा | प्रतिनिधी : वाफोली  गावात पोलवर काम करताना कंत्राटी वीज कामगार प्रतिक दळवी (रा. विलवडे) हा वीज पोलवरुन पडून जखमी झाला होता. त्याच्यावर सावंतवाडी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वीज कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात भेट देऊन उपचारासाठी आर्थिक मदत केली.

सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस करून सहकाऱ्यांनी त्याला धीर दिला. यावेळी वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष संदीप बांदेकर, सरचिटणीस योगराज यादव, कोषाध्यक्ष बापू देसाई, प्रकाश धुरी, अमोल वाडकर, दत्तप्रसाद कांदे, धनंजय मांजरेकर, रितिक खोरागडे, राजेश वेंगुर्लेकर, कायम कर्मचारी अमित वाघाटे, नरेश मोतीपल्ले, कंत्राटी कामगार गणेश देसाई, भूषण कदम, राजगुरू, मंदार गोसावी, अजित पालेकर, गंगाराम सावंत आदी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी  कामगार संघाने जखमी प्रतीक दळवी याला धीर दिला. कामगार संघ पाठीशी असल्याची ग्वाही अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी दिली. यावेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर उपस्थीत होते.