गाडी आता पहाटे ४.१३ वाजता हसनला पोहोचणार; ४.१५ वाजता सुटणार
देवगड : प्रतिनिधी
दक्षिण पश्चिम रेल्वेने कारवार–केएसआर बंगळुरू पंचगंगा एक्स्प्रेसच्या हसन स्थानकावरील वेळेत बदल केला आहे. हा बदल १० सप्टेंबर २०२६ पासून तातडीने लागू करण्यात आला आहे.
रेल्वे क्रमांक १६५९६ कारवार–केएसआर बंगळुरू पंचगंगा एक्स्प्रेस हसन स्थानकावर सध्या पहाटे **४.०५ वाजता पोहोचून ४.१० वाजता सुटत होती. सुधारित वेळापत्रकानुसार आता ही गाडी हसन स्थानकावर पहाटे ४.१३ वाजता पोहोचेल आणि ४.१५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
दक्षिण पश्चिम रेल्वेने प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. पंचगंगा एक्स्प्रेसच्या हसन स्थानकावरील थांब्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रक लक्षात घेणे आवश्यक आहे.
गाडीचे सविस्तर थांबे व वेळापत्रक जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी KR Mirror App उपलब्ध करून देण्यात आले आहे.











