पोलिसांनी केली कारवाई
रत्नागिरी ः प्रतिनिधी
चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला शहर पोलिसांनी मांडवी ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावरील अलहंम पार्कसमोर गुरुवार 10 सप्टेंबर रोजी रात्री 9.46 वा.सुमारास अटक केली.
मोहम्मदताहिर इब्राहिम मस्तान (36,रा.वरचा मोहल्ला मिरकरवाडा,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड काँस्टेबल गणेश सावंत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी मोहम्मदताहिर मस्तानला उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रायगड या चार जिल्ह्यातून 2 वर्षांकरता हद्दपार केले होते. या बाबतचा आदेश 12 जुलै 2026 रोजी बजावण्यात आला होता. या हद्दपारीच्या कालावधीत आरोपीने या चार जिल्ह्यात वास्तव्य करणे अपेक्षित नव्हते. परंतू त्याने या आदेशाचे पालन न करता तो शहरातील मांडवी ते पेठकिल्ला रस्त्यावर मिळून आला असता त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 141,142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












