आचरा–अर्जुन बापर्डेकर
आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी आचरे गावातील 42दिवस चालणा-या रामेशवर मंदिरातील गणेशासह आचरे गावातील काही घरगुती गणपतीं चेही दर्शन घेतले.
आचरा देवूळवाडी येथील पत्रकार अर्जुन बापर्डेकर यांच्या घरी विराजमान गणपतीचेही दर्शन त्यांनी घेतले. यावेळी लक्ष्मण बापर्डेकर यांच्या हस्ते त्यांचा ,सन्मान केला गेला, यावेळी वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारीअर्जुन बापर्डेकर, तलाठी सुनीता मेस्त्री, पोलीस कर्मचारी मिलिंद परब,मनोज पुजारे,विशाल वैजल यांसह महेश बापर्डेकर, वेदान्त बापर्डेकर आदी उपस्थित होते.













